वारेन बफेट यांच्याकडून शिका श्रीमंत होण्याचे ५ नियम

Share

जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांची संपत्ती ५ लाख करोड पेक्षा जास्त आहे. ज्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी शेअर मार्केट मध्ये पहीला शेअर विकत घेतला होता. ज्यांनी लहानपणीच ठरवले होते, कि १ दिवस मी खूप श्रीमंत होणार आणि असे वारेन बफेट (Warren Buffett) यांनी त्यांच्या मित्रा मध्ये जाहीर सुद्धा केले होते.

मी जर वयाच्या ३० व्या वर्षी मी जर अब्जाधीश झालो नाही, तर मी आत्महत्या करीन. मित्रांनो, कोट्याधीश सुद्धा नाही, अब्जाधीश ते आपल्या १६ वर्षी सुद्धा आपल्या शिक्षकांपेक्षा जास्त कमवत होते आणि एवढे श्रीमंत असून सुद्धा आजून पण आपल्या त्याच 3BHK Flat वर राहणारे वारेन बफेट (Warren Buffett) त्यांचे पैशांच्या बाबतीत ५ नियम आपण जाणून घेणार आहोत (warren buffett investment strategy). त्यात आपल्याला बर्याच प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल, लेख शेवट पर्यन्त वाचा.

वारेन बफेट यांच्याकडून शिका श्रीमंत होण्याचे ५ नियम

१. फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नकावारेन बफेट

उत्पन्नाची अनेक मार्ग निर्माण करा मित्रांनो, मला माहित आहे जेव्हा सुरुवातीला आपण हे ऐकतो, तेव्हा थोडा धक्का बसतो आणि महत्त्वाच म्हणजे, आपल्यासारखा सामान्य माणूस विचार करतो कि इथे धड १ उत्पन्नाचा मार्ग मिळत नाही. मग अनेक मार्ग निर्माण कसे करायचे? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, आपल्याला लहानपणी असे कोणी सांगतच नाही.

आपल्याला लहानपणापासून हेच सांगितले जाते, नीट शाळा शिका शिक्षण पूर्ण कर आणि नोकरीला लाग त्यामुळे आपल्या मनात दुसरे उत्पन्न निर्माण करण्याचा कधी विचारच येत नाही. वारेन बफेट (Warren Buffett) यांनी Berkshire Hathaway कंपनी स्थपण केली आहे त्या अंतर्गत ७ कंपन्या आहे.

त्यामुळे एका कंपनीचा तोटा जरी झाला ,तरी बाकीच्या कंपन्या तिला सांभाळून घेतात. आपण जेव्हा अनेक उत्पन्नांचा मार्ग शोधायला लागू, तेव्हा अनेक मार्ग दिसायला लागतील.

पण तुम्ही म्हणाल नाही ते शक्यच नाही मग त्याला कोणी काहीच करू शकत नाही. कारण मनानेच तुम्ही हरला त्यामुळे आता स्वतःला प्रश्न विचारा मला आजून पैसे कमावण्यासाठी काय काय करता येईल?

मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आता तुम्ही करत असलेल्या कामाव्यतिरिक्त २ ते ३ पर्याय नक्की सुचतील, करून बघा आणि हाच विचार आता पासूनच आपल्या मुलांवर बिंबवायला सुरुवात करा कि मोठे होऊन त्यांना फक्त नोकरीच नाही करायची. तर उत्पन्नाचे अनेक पर्याय निर्माण करायचे आहे, दुसरा नियम बघण्या अगोदर या नियमाविषयी प्रश्न बघूया. खर्च कसा करावा या संदर्भात वारेन बफेट म्हणतात.

२. अनावश्यक खर्च

“तुम्ही जर अशा गोष्टींवर खर्च करत असाल ज्यांची तुम्हाला गरज नाही ,तर लवकरच तुम्हाला गरज असलेल्या गोष्टी विकाव्या लागतील .”मित्रांनो हा एक जबरदस्त नियम आहे .जेव्हा मी हा नियम ऐकला ,तेव्हा मला असे समजले अरे ! आपण आतापर्यंत किती अनावश्यक गोष्टींवर
खर्च केला आहे.

पण हा नियम समजल्यावर माझे डोळे उघडले कारण मी काही लोकांना बघतो. त्यांचा पगार आहे २०-२५ हजार पण त्यांच्या हातात तुम्हाला ७० -८० हजाराचा आयफोन दिसेल. घरात सगळ्या टॉप ब्रंड वस्तू भेटतील जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल? हे तुम्ही कसे मॅनेज करता? तेव्हा ते सांगतील, EMI आहे न म्हणजे कर्ज कढून त्या विकत घेतल्या.

मी अशी पण लोक पहिली आहे कि ऐपत नसताना लग्नामध्ये १०-१५ लाख रुपये खर्च करतात आणि मग आयुष्यभर त्याचा हप्ता भरत राहतात. आता तुम्हीच मला सांगा उद्या यांच्या घरावर काही संकट आल, म्हणजे कोण आजारी पडले किंवा कोणाची नोकरी गेली.

तेव्हा काय करावे लागेल? तेव्हा निश्चितच ज्या गरजेच्या वस्तू आहे ,त्या विकाव्या लागतील. जसे कि दागिने, घर वगैरे त्यामुळे कुठही खर्च करताना निट विचार करा. मला खर्च याची गरज आहे का ?आणि खरच गरज असेल तेव्हाच विकत घ्या.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

३. पैशाची बचत कशी करायची?

वॉरेन बफेट म्हणतात ,पैशे बचतीचे २ प्रकार आहे .१ गरीब लोकांची पद्धत २. श्रीमंत लोकांची पद्धत .गरीब लोकांची मानसिकता अशी असते, जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतात तेव्हा ते पहिले खर्च करतात आणि नंतर जे काही उरले सुरले पैसे असतील, त्याची बचत करतात. पण श्रीमंत लोक आलेल्या पैशातून आधी बचत करतात. म्हणजे ते आधी ठरवतात, कि एवढ्या पैश्याची बचत केली पाहिजे आणि मग बाकीच्या पैशातून ते आपला खर्च भागवतात

म्हणजे समजा ,श्रीमंत लोकांकडे २० हजार रुपये आले, तेव्हा ते ठरवतात यातली ५ हजाराची बचत करायची आणि बाकीचे १५ खर्च करायचे त्याच्या उलट गरीब मानसिकतेची लोक असतात त्यांच्याकडे पैसे आली कि, ते कसेही उधळतात अनावश्यक गोष्टी विकत घेतात आणि मग राहिले १ किंवा २ हजार त्यांची बचत करतात. खूप छोटा नियम आहे .पण हा खूप लॉँग टर्म साठी फायदा देऊ शकतो.

४. रिस्क कशी घ्यायची?

मित्रांनो आपण बर्याच लोकांकडून ऐकले आहे .कि रिस्क घेण म्हणजे सगळे पणाला लावणे .जसे कि ,एलोन मस्क ने त्याचे सगळे घर विकून कंपनी घ्यायची रिस्क घेतली होती. आपल्या सगळ्यांचा समज हाच असतो. तेव्हा वारेन बफेट म्हणतात, तुम्हाला जर नदी किती खोल आहे? हे बघायचे असेल? तर दोन्ही पाय नदीमध्ये टाकू नका एक पाय बाहेर ठेवा आणि एक पाय आत टाका आणि मग तपासून बघा कि नदी किती खोल आहे.

याचा अर्थ काय? रिस्क घेण म्हणजे तुम्ही जे काही प्रयत्न कराल जी काही गुंतवणूक कराल त्याचा तुम्हाला चांगला पडतळा मिळाला पाहिजे त्या रिस्क ने तुम्हाला संपवले नाही पाहिजे. उदाहरण म्हणजे, समजा तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे तेव्हा असा विचार करा, हा व्यवसाय पूर्ण फेल जरी झाला, तरी मी आता जसा जगतो आहे, तसा जगू शकतो का?

माझी बायको ,माझी मुले ,त्यांचे शिक्षण ,आजारपण हे मी व्यवस्थित करू शकतो का? व्यवसाय फेल झाल्यानंतर मी डिप्रेशन मध्ये तर जाणार नाही ना ? या प्रश्नाची उत्तरे सकारात्मक असतील, तर रिस्क घ्यायला हरकत नाही.

म्हणजे तुमच्याकडे जर ५ लाखाची सेविंग असेल तर तुम्ही १ किंवा २ लाखाची रिस्क घेऊन शकता. कारण व्यवसाय तोट्यात जरी गेला, तरी राहिलेले ३ लाख रुपये तुम्हाला वाचवतील.

५. वस्तू कधी विकत घ्याव्यात ?

वॉरेन बफेट म्हणतात, वस्तू विकत घेताना डिस्काउंट मागायला आजीबात लाजू नका किंवा मोठ्या सेलची वाट बघा कारण जेव्हा कधी सेल लागतो, तेव्हा खूप चांगल्या चांगल्या वस्तू स्वस्त दरात मिळतात आणि असे केल्याने तुमचा खूप फायदा होऊ शकतो बरीच श्रीमंत लोक या युक्तीचा वापर करतात.

मित्रांनो जर श्रीमंत लोक डिस्काऊंट मागायला लाजत नसतील, तर आपण कशाला लाजले पाहिजे,तुम्हा सर्वांना माहिती आहे कि सदया अमॅझॉन वर डिस्काऊंट चालू आहे .आणि खूप चांगल्या चांगल्या वस्तू स्वस्त दरात मिळत असतात.

आपल्या फेसबुक पेजवर मी आजून तुम्हाला उपयुक्त असलेल्या गोष्टी अपडेट करणार आहे. त्यामुळे माझ्या फेसबुक पेजला लाईक करा. मला खात्री आहे कि, वॉरेन बफेट यांनी तुमच्या मनात चाललेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली असतील. तरी सुद्धा तुम्हाला पैशा न संदर्भात काही प्रश्न असतील, तर मला कमेंट मध्ये विचार .

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top