Business Ideas for Women स्त्रियांसाठी व्यवसाय खूप पैसे कमवून देतील

Share

Business Ideas for Women मी तुम्हाला स्त्रियांसाठी व्यवसाय घरातून करण्यासारखे अत्यंत कमी भांडवलामध्ये चालू होणारे ५ व्यवसाय सांगणार आहे (Business Ideas for Women).

तुम्ही शॉर्टकट मध्ये पैसे कमवायचे ठरवले असेल तर तर सुरुवातीलाच तुमची माफी मागून सांगतो हि पोस्ट तुमच्यासाठी नाही ये कारण प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते तसेच ह्या व्यवसायाला सुद्धा मेहनत लागणार आहे. पण जर मनापासून मेहनत करायची तयारी असेल, तर त्याचे फल आपल्याला नक्की मिळतेच मिळते .

Business Ideas for Women

१. बेकरी प्रोडक्टस-

bakery products
Photo by Parag Gaikwad on Unsplash

मित्रांनो, माझी एक आत्त्ते बहिण आहे. जेव्हा लॉकडाऊन चालू झाले, तेव्हापासून तिने घरीच बसून केक बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला तिला भीती वाटत होती कि मला जमेल कि नाही म्हणून पण तिच्या नवर्‍याने तिचा विश्वास वाढवला आणि महत्त्वाच म्हणजे त्यांच्याकडे ओव्हेन सुद्धा नाहीये. तरी सुद्धा तिने करायचे ठरवले आधी काही प्रयोग करून पहिले.

जेव्हा विश्वास आला, तेव्हा तिने तिच्या Whatsapp Group केकची मार्केटिंग करायला सुरुवात केली. हळूहळू ऑर्डर्स येऊ लागल्या सुरुवातीला दिवसाला १ नंतर २, ३आणि आता तिला दिवसाला ५ पेक्षा जास्त ऑर्डर येतात. कधीकधी तिला काही ऑर्डर कॅन्सल सुद्धा कराव्या लागतात. एवढा जबरदस्त प्रतिसाद तिला मिळत आहे मला सांगायचा मुद्दा काय? कि कोरोनामुळे लोक शक्यतो दुकानामधून गोष्टी आणायच्या टाळत आहे .

पण लोकांचे वाढदिवस, मदर्स डे, फादर्स डे, ब्रदर्स डे, सिस्टर्स डे अशा अनेक गोष्टी साजर्‍या करायची प्रथा आपल्या भारतात आली आहे आणि प्रत्येक समारंभाला केक हा हवाच असतो.

त्यामुळे मित्रांनो सद्या तुम्ही बेकरीचे प्रोडक्स जसे कि केक, चोकलेट, नानकटाइ , बिस्कीट, चिप्स घरी बनवून त्याचा व्यवसाय चालू केला तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल सगळ्या पदार्थांच्या रेसिपीज युटूबवर उपलब्ध आहे .

२. स्त्रियांसाठी व्यवसाय Youtube Chanel

तुमच्यामध्ये जर काही चांगली कला आहे. जसे कि तुम्हाला चांगले जेवण बनवता येत, डान्स चांगला येतो, तुम्ही कविता चांगली करता तुम्ही चांगले लिहिता किंवा मुलांवर संस्कार कसे करायचे? अशा कोणत्याही विषयामध्ये तुम्ही एक्स्पर्ट असाल, तर तुम्ही तुमचे Youtube Chanel चालू केले पाहिजे. सद्ध्या युटूबवर लोक त्यांची प्रतिभा दाखवून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

नुकतेच मी पाहिले कि एका सत्तर वर्षांच्या आजीनी त्याचा कुकिंग चॅनेल चालू केला आहे. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आता त्या दर महिन्याला ५० हजार पेक्षा जास्त कमवत आहे. युटूब चॅनेलवर पैसे यायला थोडा वेळ लागतो पण एकदा चालू झाले, कि तुम्ही अनेक मार्गांनी युटूब चॅनेलवर पैसे कमवू शकतात. युटूब चॅनेल ओपन करायला काही पैसे लागत नाही.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

३. टिफिन सर्व्हिस किंवा चटकदार पदार्थांचा व्यवसाय –

मित्रांनो सद्ध्या करोनामुळे हॉटेलमध्ये जायला किंवा बाहेरून जेवण माघवायला लोक घाबरत आहे .ह्या संधीचा फायदा उचलून तुम्ही तुमचा टिफिन व्यवसाय चालू करू शकतात .आमच्या सोसायटीत एक ताई आहे .त्यांनी अशीच टिफिन सर्व्हिस चालू केली आहे. त्यामध्ये त्यांनी ५-६ अशे मोजकेच मेनू ठेवले आहे . Business Ideas for Women

जसे कि इडली चटणी,नूडल्स,व्हेज बिर्याणी,पिज्जा वगैरे वगैरे त्या ताई त्यांच्या टिफिन व्यवसायाची मार्केटिंग रोज आपल्या सोसायटीच्या व्हाटसप ग्रुप वर करत असतात आणि रोज त्यांचे ४-५ ऑर्डर फिक्स असतात. त्या सांगतात सुट्टीच्या दिवशी तर त्यांना बसायला सुद्धा वेळ नसतो एवढ्या ऑर्डर असतात.

मित्रांनो हि उदाहरणे मी का देतोय? कारण हे व्यवसाय चालत आहे. हे मी स्वतः डोळ्यांनी बघतो आहे आता आमच्या सोसायटी मध्ये बर्याच वृद्ध जोड्या आहेत किंवा काही Bachelor आहेत. ज्यांना जेवण बनवायला जमत नाही. अशा लोकांना सुद्धा त्या ताई मंथली मेसची सुविधा देत आहे .

त्यामुळ तुम्ही सुद्धा तुमच्या चाळीमध्ये, कॉलनी मध्ये, सोसायटीमध्ये अशी टिफिन सर्विस चालू करू शकतात .सुरुवातीला तुमच्या व्हाटसप ग्रुपवर मार्केटिंग करा .एकदा तुमचे नाव झाले, कि माऊथ प्ब्लीसिटीमुळे भरपूर ऑर्डर यायला सुरुवात होते .

वारेन बफेट यांच्याकडून शिका श्रीमंत होण्याचे ५ नियम

४. शेअर मार्केट Business Ideas for Women

Photo by Md Mahdi on Unsplash

शेअर मार्केट म्हटल कि, लोकांना वाटते जुगार आहे .पण लोकांना हे माहित नाही कि तो जुगार कधी होतो जेव्हा तुम्ही कोणतेही द्यान न घेता शेअर मार्केट मध्ये उतरतात आणि शेअर मार्केट मध्ये फक्त ट्रेडिंग मधेच पैसे कमवता येतो असे आजीबात नाही. तुम्ही गुंतवणुकीच्या हिशोबाने सुद्धा शेअर मार्केट मध्ये १ चांगला पर्याय म्हणून बघू शकतात .

म्हणजे तुम्ही शेअर मार्केटचा निट अभ्यास करून कोण कोणत्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे एवढा अभ्यास जरी तुम्ही केला, तरी गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. पण तुमच्यामध्ये जिद्ध आहे आणि मेहनत करायची तयारी आहे तर शेअर मार्केटचे चांगले ज्ञान घेऊन सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकतात.

मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे तर डीमॅट अकाऊंटची गरज लागते त्याच्यावरून तुम्ही शेअर ची खरेदी विक्री करू शकतात. मी जे स्वतः डीमॅट अकाऊंट वापरतो ते आहे एंजेल ब्रोकिंग डीमॅट अकाऊंट.

कारण इथे डीमॅट अकाऊंट तयार करणे फ्री आहे. बाकी कुठ्ल्याही ब्रोकिंग कंपनीमध्ये तुम्हाला डीमॅट अकाऊंट तयार करण्यासाठी पैसे मोजावे लागतात इथे डिलिव्हरी फ्री आहे आणि ट्रेनिंग साठी सुद्धा खूप कमी ब्रोकरेज वापरले जाते Business Ideas for Women .

तुम्हाला Angel Broking मध्ये अकाऊंट तयार करायचे असेल? खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतःची माहिती भरा आणि आवश्यक ते डोकॉमेंट्स तयार करा. १ किंवा २ तासामध्ये तुमचे अकाऊंट ओपन होईल. शेअर मार्केट मध्ये तुम्ही अत्यंत कमी पैशामध्ये म्हणजे अगदी ५०० रूपयांमध्ये सुद्धा सुरुवात करू शकता .

Angel Broking मध्ये अकाऊंट तयार करण्यासाठी येथे क्लिक करा

५. ऑनलाईन बिजनेस –

भविष्यकाळ हा ऑनलाईनचा असणार आहे. आताच तुम्ही निरीक्षण केले असेल तर लॉकडाऊन च्या काळात सुद्धा पूर्ण जग बर्यापैकी चालू होते. ते कशामुळे ऑनलाईन व्यवस्थेमुळे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय तुम्ही ऑनलाईन चालू करू शकतात. जसे कि साडी, ड्रेस मटेरिअल, मेकुअपचे समान, लहान मुलांचे कपडे, दैनंदिन जीवनात लागणार्‍या वस्तू, अश्या अनेक गोष्ठी तुम्ही विकू शकतात.

online business
Photo by Nick Morrison on Unsplash

स्त्रियांसाठी व्यवसाय मार्केटिंगसाठी एक फेसबुक पेज बनवा इंस्ताग्राम पेज बनवा तुमच्या फेसबुकच्या मित्रमैत्रिणींना ते लाईक करायला सांगा. त्याच्यावर तुमच्या प्रोडक्सची मार्केटिंग करा किंवा तुमच्या सर्व व्हाटसप ग्रुपमध्ये तुमच्या प्रोडक्टसची मार्केटींग करू शकतात. माझ्या अनेक मित्र आणि नातेवाईकांनी हा व्यवसाय चालू केला आहे आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.

काय असते आपल्याला सुरुवातीला भीती वाटते मला प्रतिसाद मिळेल का? अनेकजन हा व्यवसाय करणारे आहे. अशा शंकाकुशंका मनामध्ये येतात. पण माझे म्हणणे आहे आधी तुम्ही प्रयत्न तर करून बघा. हे जे सर्व व्यवसाय मी सांगितले आहे. त्याला खूप कमी भांडवल लागणार आहे. म्हणजे अपयश जरी आले, तरी तुमचे काहीच नुकसान होणार नाही पण विचार करा.

जर तुम्हाला ह्या कोणत्याही व्यवसायामध्ये चांगले यश मिळाले, तर त्याचा तुमच्या आयुष्यात किती फायदा होईल. मला आशा आहे कि ह्या व्यवसायांची कल्पना तुम्हाला आवडल्या असतील तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top