Time management book summary
नमस्कार मित्रांनो, एका यशस्वी आणि एका अयशस्वी या दोघांनाही दिवसाचे चोवीस तासच वेळ मिळतो. कुणाला कमी किंवा कोणाला जास्त नाही. सगळ्यांना सारखाच वेळ मिळतो आणि हे 24 तास ते कसा वापरतात त्यावर त्यांचे भविष्य अवलंबून असते आणि त्यामुळे आपल्याला आपली 24 तासाचे नियोजन करता आले पाहिजे. डॉक्टर सुधीर दीक्षित यांच्या time management या पुस्तकातून.
१. वेळेचे लॉकबुक ठेवा-
ज्याप्रमाणे पैशाचे अंदाजपत्रक असते तसेच वेळेचेही अंदाजपत्रक बनवा. म्हणजेच तुमचा वेळ कुठे कसा खर्च होतो याचा हिशोब ठेवा. ड्रायव्हरच्या भाषेत यालाच लॉकबुक म्हणतात. असे एका आठवड्यातील लॉकबुक बनवा म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे कळेल कि तुम्ही मोबाईल वर किती वेळ वाया घालविता.
आता मला खूप लोक म्हणतील कि त्यासाठी लॉकबुक बनवायची काय गरज आहे? मला माहित आहे की आमचा दिवसभर वेळ कसा जातो पण असा विचार अजिबात करू नका. हे लॉकबुकच तुम्हाला पुढचे पॉइंट कळायला आणि शिस्त लावायला मदत करेल. हे लॉकबुक म्हणजे तुम्ही जो खर्च करतात त्या वेळेचा x-ray आहे.
तसेच डॉक्टर आजाराचे मूळ शोधण्यासाठी x rayकाढायला सांगतात. त्याचप्रमाणे या लॉकबुकमुळे तुम्हाला तुमच्या वेळेचा छोट्या छोट्या पार्टकडे डिटेलमध्ये लक्ष देता येईल.त्यामुळे वेळेचे लॉकबुक बनवा.
२. आर्थिक ध्येय ठरवा-
तुम्ही तयार होऊन निघालात पण तुम्हाला जायचे कुठे हेच माहीत नसेल तर तुम्ही कुठेच पोहचणार नाही. सेम त्याचप्रमाणे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात कुठे पोहोचायचे आहे हे माहित पाहिजे. तरच तुम्ही तिथे पोहोचू शकता, म्हणजेच तुम्हाला एक निश्चित आर्थिक हे ठरवता आले पाहिजे.
ध्येय हे २ प्रकारचे असतात.
- सामान्य ध्येय
- निश्चित ध्येय
जसे की मी जास्त मेहनत करीन, मी माझ्या स्किल वाढविल हे झाले सामान्य ध्येय तर मी रोज ८ तास काम करीन. मी 20 हजार रुपये महिना कमवीन, हे झाले निश्चित ध्येय. म्हणजे जे ध्येय मोजता येते ते निश्चित ध्येय असते. तुमचे एक निश्चित ध्येय ठरवा. तुमचे ध्येय जेवढे स्पष्ट असेल तेवढे ते तुम्हाला मिळवायला सोपे जाईल.
जसे कि एका दुकानदाराला दर महिना दहा हजार रुपये कमवायचे असतील आणि एक वस्तू विकून त्याला पन्नास रुपये प्रॉफिट मिळत असेल, तर १० हजार रुपये कमावण्यासाठी त्याला महिन्याला दोनशे वस्तू विकाव्या लागतील आणि तो महिन्यात २५ दिवस काम करत असेल तर त्याला रोज आठ वस्तू तरी विकाव्या लागतील.
म्हणजेच रोज ८ वस्तू विकण्याचे एक छोटेसे काम त्यांची दहा हजार रुपये महिना कमवण्याचे मोठे ध्येय पूर्ण करते. सोबतच एकदा हा आकडा निश्चित झाल्यावर तुम्हाला कामात टाळाटाळ करता येत नाही म्हणून तुम्ही तुमचे निश्चित आर्थिक ध्येय ठरवा.
३. सगळ्यात महत्वाचे काम सगळ्यात आगोदर करा-
खूप लोक दिवसभर आपला सगळा वेळ छोटी कामे करण्यात घालवतात ज्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कामाला वेळच (Time Management) मिळत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले रिझल्ट महत्त्वाच्या कामातूनच मिळतात, नाही की छोट्या आणि सामान्य कामातून. म्हणूनच तुम्हाला तुमच्या कामाचा क्रम ठरवता आला पाहिजे आणि महत्त्वाचे काम अगोदर करता आले पाहिजे आणि हे करणे खूप सोपे आहे.
त्यासाठी तुम्ही एका डायरीत A, B आणि C असे ३ कॉलम करा. A कॉलम मध्ये तुम्ही असे काम लिहा जे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे आणि ते कंम्पलसरी करावेच लागणार आहे. B कॉलम मध्ये महत्त्वाचे पण ते नाही केले तरी जास्त काही बिघडणार नाही. असे काम लिहा आणि शेवटच्या C कॉलम मध्ये रोजचे सामान्य काम लिहा.
आता तुमच्या दिवसाची सुरुवात A कॉलममधील कामापासून करा आणि असे करता करता A कॉलममधील सगळे काम पूर्ण करा आणि नंतर B कॉलम आणि नंतर वेळ उरला तर C कॉलममधील काम करा. ज्यामुळे तुमचे महत्त्वाचे काम वेळेवर संपत जातील.
4. प्रवासातील वेळेचा (Time Management) उपयोग करा-
रोजच्या कामासाठी आपल्याला बराच प्रवास करावा लागतो आणि या प्रवासात वेळ पण भरपूर जातो. एक सामान्य माणूस हा वेळ वाया घालवतो, तर याउलट एक सक्सेसफुल माणूस या वेळाचा जास्तीत जास्त वापर करतो. महात्मा गांधी हे प्रवासात झोप काढीत जेणेकरून त्यांना उठल्यानंतर सरळ कामाला सुरुवात करता येईल.
नेपोलियन बोनापार्ट आपल्या प्रवासात महत्त्वाचे पत्र लिहित.हे लोक आपल्या प्रवासात वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करायचे. पण आपण मात्र आपल्या प्रवासातील वेळ गाणे ऐकत, नाही तर गप्पा मारत वाया घालवतो हाच वेळ आपण पुस्तक वाचायला, रेडीओबुक ऐकायला, नाही तर आमच्या बुक समरी वाचायला वापरू शकतात. म्हणजेच या वेळेचा चांगला उपयोग होईल. सोबतच तुम्हाला नवीन काहीतरी शिकता येईल.
५. इतरांवर काम सोपवा-
कोणताही माणूस सगळे काम एकटाच करू शकत नाही. तरीही अनेक जण सगळी कामे स्वतःच कमी करायचा प्रयत्न करत असतात. सुरुवातीला हि गोष्ट कितीही चांगली वाटली तरीही जेव्हा तुमचा व्यवसाय वाढतो त्या वेळेस पुढच्या मोठ्या सक्सेससाठी तुम्हाला तुमची छोटी कामे दुसर्यांवर सोपवता आली पाहिजे.
म्हणजे तुमचा कामाचा लोड कमी होईल आणि पुढील महत्त्वाच्या कामात तुम्हाला जास्त फोकस करता येईल. म्हणून इतरांवर काम सोपवायला करायला सुरुवात करा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Income Tax Return For Housewife गृहिणीसुद्धा भरू शकतात आयटीआर | हे आहेत फायदे |
- How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |
- Home/Flat Buying tips घर घेताय, या दहा गोष्टी तपासून घ्या!
- Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
६. तुमच्या सर्वोत्कृष्ट वेळेत काम करा-
TV वर संध्याकाळी आठ ते दहा या टाईमला प्राईम टाइम म्हणतात. त्यावेळी दाखवल्या जाणार्या जाहिराती खूप महाग असतात. त्या जाहिरातीत तेवढाच वेळ असतात मात्र प्राईम टाईमला ही जाहिरात जास्त लोक बघत असतात. म्हणून त्याची किंमत जास्त असते. त्याचप्रमाणे आपल्या वेळेचा प्राईम टाईम असतो आपल्या दिवसाची 24 तास सारखे नसतात.
दिवसाच्या एखाद्या खास वेळीच आपली ऊर्जा, ऊर्जा शक्ती आणि उत्साह इतर वेळेच्या तुलनेत जास्त असतो आणि त्या वेळी आपण आपली मोठं मोठी कामे सहज करू शकतात. हा प्राईम टाइम (Time Management) प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. म्हणून तुम्हाला तुमचा प्राईम टाइम ओळखता आला पाहिजे आणि आपल्या सर्वोत्कृष्ट वेळेमध्ये काम करता आले पाहिजेत.
७. डेडलाईन ठरवा-
डेडलाईन म्हणजेच वेळेची शेवटची मर्यादा. पूर्वीच्या काळी जेलच्या ४ हि बाजूला एक बॉर्डर असायची त्या बाहेर गेल्यावर कैद्याला गोळ्या घातल्या जायच्या. त्याच रेषेला डेडलाईन म्हणतात. वेळेची डेडलाईन ओलांडली तर तुमचा जीव तर नाही जाणार मात्र तुमच्या हातातील महत्त्वाच्या संधी मात्र निघून जातील. म्हणून डेडलाईन पळायची सवय लावा.
त्यासाठी तुम्ही आपल्या कामाच्या डेडलाइन ठरवा कि इतक्या वेळात ते काम पूर्ण झालेच पाहिजे. त्यामुळे तुम्ही जास्त स्पीडने काम करतात. वेळेच्या लिमिटमुळे आपोआप तुमच्या कामावरचा फोकस वाढतो. ज्या वेळेस तुमच्यावर वेळेचा दबाव पडतो तेव्हा तुमच्या शरीरात एन्द्रेलीन (adrenaline) नावाची केमिकल रिलीज होते ज्याचा परिणाम तुम्ही जास्त कामावर होता.
उशिरापर्यंत काम करतात आणि तुमची झोप पण कमी होते आणि कमी वेळेत काम पूर्ण होतात. जसे कि तुम्ही सहा मिनिटात एक किलोमीटर पळत असाल पण जर एखादा कुत्रा तुमच्या पाठीमागे लागला तर तेच एक किलोमीटर तुम्ही आणखी कमी वेळात पार कराल. डेडलाईन असाच तुमच्या पाठीमागे लागलेला एक कुत्रा असतो जो वेगात तुमच्याकडून काम करून घेतो म्हणून डेडलाईन पाळायची सवय लावा.
८. भविष्यातील लाभासाठी वर्तमानात त्याग करा-
वेळेच्या बाबतीत आपल्याकडे दोन्ही पर्याय असतात आपण तो उपयोगात आणू शकतो किंवा वाया घालू शकतो जसे की आर्थिक फायद्यासाठी कंपन्या पैशाची गुंतवणूक करतात त्याचप्रमाणे चांगल्या भविष्यासाठी तुम्हालाही वेळेची गुंतवणूक करावी लागते.
जसे कि एक विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावर तासन्तास टी व्ही आणि मोबाईल मध्ये बिझी असतो तर दुसऱ्या विद्यार्थी मात्र हा वेळ अभ्यासात घालवत होता तर या दोघांपैकी कोणाचे भविष्य चांगले असेल? नि:संशय दुसऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य चांगले असेल. पहिल्या विद्यार्थ्यापेक्षा कारण त्याने त्यावेळची इन्वेस्टमेंट केली ज्याचा त्याला फायदा झाला म्हणून तुम्ही उद्याच्या फायद्यासाठी आजचा वेळ इन्व्हेस्ट करायला शिका.
९. तुम्ही किती वेळ काम केले ते महत्वाचे नसून त्याचा परिणाम महत्वाचा असतो-
पर्सनली हा सिद्धांत मला खूप आवडलेला आहे. कर्मचार्यांना असे वाटते की ते आठ तास काम करतात, म्हणून त्यांचा पगार वाढला पाहिजे, तर कंपनीच्या मालकाला वाटते की त्यांनी काम तर पाच हजार रुपयाचे केले, तरीही त्याला आठ हजार रुपये पगार मिळतो. म्हणून त्याचा पगार आपण कमी करायला पाहिजे.
यावरून आपल्याला हे दिसते की कर्मचार्याला हे महत्त्वाचे असते की त्याने किती तास काम केले तर मालकासाठी हे महत्त्वाचे असते की त्याने किती काम केले. कोणतेही क्षेत्र असुद्या तुम्ही किती वेळ काम केले याला महत्त्व नसते तर तुम्ही किती काम केली याला महत्व असते आणि त्या कामातून किती निकाल मिळाला हे महत्त्वाचे असते.
जसे की वर्माजीचे घर बांधायला पंचवीस वर्षे लागली, तर 22 वर्षांत बांधलेल्या ताजमहाल पेक्षा त्यांचे घर चांगले होईल काय? म्हणजेच कामाचा कालावधी महत्त्वाचा नसून त्याचा परिणाम महत्त्वाचा आहे. तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करा.
10. सापेक्षतेचा नियम समजून घ्या-
सापेक्षतेचा नियम हा वेळेच्या बाबतीतही खूप महत्त्वाचा असतो. वेळ तेवढाच असतो फक्त आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तुम्ही व्हिडिओ गेम खेळत असाल तर तुम्हाला कळणारही नाही की दोन तास कुठे गेले पण जर याउलट तुम्हाला अभ्यासाला बसवले तर तुम्हाला पंधरा मिनिटही एका तासा सारखे वाटतील.
म्हणजे जर तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडत असेल, तर ते तुम्ही वेळेकडे लक्ष न देता फ्लोमध्ये काम करतात. ज्यामुळे सहजपणे तुमच्याकडून चांगल्या क्वालिटीचे काम होते. म्हणूनच तुम्ही आपले प्रत्येक काम मनोरंजक करा. काम संपल्यावर स्वत:लाच बक्षीस देण्याची लालूच दाखवा. आवडीचे चॉकलेट खाण्याची, मूव्ही बघण्याची, लालूच दाखवा.
म्हणजेच तुमचे काम थोडे इंटरेस्टिंग होईल आणि तुम्ही ते सहजपणे कराल. तर मी हे सगळे पॉइंट तुम्हाला डॉक्टर सुधीर दीक्षित यांच्या टाईम मॅनेजमेंट या पुस्तकातून सांगितले आहे. त्या पुस्तकात टाईम मॅनेजमेंट (Time Management) संबंधित ३० सिद्धांत सांगितले आहे.
डॉक्टर सुधीर दीक्षित यांच्या टाईम मॅनेजमेंट या पुस्तक खरेदी करणेसाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- What is Zero FIR?, Zero FIR म्हणजे काय?
- घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!
- घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती
- PF खातेदारांना मिळणार 7 लाखांचा विमा, EPFO Members Insurance
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा