Laghu Udyog कमी खर्चात सुरू करता येतील हे लघु प्रक्रिया उद्योग

Share

Laghu Udyog भारत हा कृषि प्रधान देश आहे. अनेक शेतकरी शेती सोबत चांगले उत्पन्न देणारा जोड व्यवसाय करत आहेत. अनेक शेतकरी असे आहेत, की ज्यांना शेती सोबत जोड व्यवसाय करायचा असतो. परंतु भांडवला अभावी त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही.

आपण बघणार आहोत की कमी खर्चात कोणते लघु प्रक्रिया उद्योग सुरू करता येऊ शकता. लेख शेवट पर्यंत वाचा व आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणीना शेअर नक्की करा.

कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणारे अनेक प्रक्रिया उद्योग करता येऊ शकतात. सरकार कडून अनेक लघु उद्योगांना अनुदान देखील देण्यात येते. नाचणी बिस्की, पापड व्यवसाय, लोणच व्यवसाय, ज्वारी रवा उत्पादन, कोरफड ज्यूस यासारखे लघु प्रक्रिया उद्योग कमी भांडवल मा सुरू करता येऊ शकतात.

Laghu Udyog कमी खर्चात सुरू करता येणारे लघु उद्योग:

नाचणी बिस्किटे:

भरड धान्य आणि तृण धान्यांना सध्या देशात मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. यासाठी सरकार कडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजनाही राबविण्यात येतात.

बदलणाऱ्या जीवन शैलीमुळे मेद युक्त पदार्थांना पर्याय म्हणून तृण धान्यांचा वापर करण्यास पसंती देण्यात येत आहे.

मिलेट्स पासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्या ग्राहकांकडून मागणी वाढते आहे. नाचणी बिस्कीट बनवण्याचा व्यवसाय हा कमी भांडवलामध्ये सुरू करता येतो. शिवाय स्थानिक पातळीवर मार्केट देखील लगेच उपलब्ध होते.

सरकार कडून प्रक्रिया उद्योगांना अनुदान देण्यात येते. त्यामुळे कमी खर्चामध्ये नाचणी किंवा मिलेट पासून बिस्किट बनवण्याचा व्यवसाय हा फायद्याचा ठरू शकतो.

नाचणी, लोणी, तूप साखर किंवा गूळ, पॅकेजिंग साहित्य, व्हॅनिला पावडर, बेकिंग पावडर अशा प्रकारचा कच्चामाल हा नाचणी बिस्किटे बनवण्यासाठी वापरण्यात येतो.

ज्वारी रवा उत्पादन 

तृण धान्यापासून बनवलेल्या उत्पादनांना मार्केट मध्ये मोठी मागणी असते. ज्वारी, रवा किंवा इडली रवा अशा प्रकारच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सर्व लोकांमध्ये तृण धान्याची मागणी वाढत आहे.

तृण धान्यापासून बनवण्यात येणारी उत्पादने तयार करून व्यवसाय सुरू करता येतो व व्यवसाय सुरू करणारा आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतो.

पापड व्यवसाय 

उन्हाळा सुरू झाला की वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी महिला वर्गाची लगबग सुरू होते. कुरडया, पापड, तिखट, मसाले बनविण्यासाठी महिलांची तयारी चालू होते. 

परंतु फक्त उन्हाळी काम म्हणून याकडे न बघता वाळवणीच्या पदार्थांचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. अनेक महिला अशा प्रकारचे गृह उद्योग करतात. गृह उद्योगासाठी सरकार कडून अनुदान देखील देण्यात येते.

यामधील पापड व्यवसाय हा कमी खर्चाचा व्यवसाय म्हणून सुरू करता येईल. पापड बनविण्याची प्रक्रिया सोपी आहे .

शहरी भागातील नोकरी करणाऱ्या महिलांना वाळवणीचे पदार्थ बनविणे शक्य होत नाही. त्याचा परिणाम म्हणून अशा पदार्थांची मागणी वाढते आहे.

पापड बनविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी जसे उडीद डाळ, मूग डाळ किंवा विविध प्रकारचे डाळी वापरतात येऊ शकतात.

ज्या प्रमाणे मागणी आहे त्या प्रमाणे १०, २० किंवा 40 पापडांचे पॅकेट बनवून विकता येऊ शकतात .

लोणचे व्यवसाय 

आपल्या भारत देशातील लोकांना जेवण करताना सोबत लोणचं हे हवं असतच. लोणच्याने जेवणाची चव वाढतेच परंतु व्यवसाय म्हणून कमी खर्चात नफा मिळवून देणारा हा एक लघु उद्योगच आहे 

हे आहेत महिलांना घरबसल्या पैसे मिळवून देणारे व्यवसाय

विविध पदार्थांपासून लोणचे हे बनवले जाते. लिंबू, हळद, कैरी, मिरची अशा पदार्थांपासून लोणचे बनवून त्याचा व्यवसाय करता येतो. कमी भांडवलामध्ये उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या साठी लोणचे व्यवसाय हा चांगला पर्याय आहे. सध्या बाजारात तयार लोणच्यांना मागणी आहे.

भारतातील लोकांना कैरीचे लोणचे, लिंबूचे लोणचे, करवंदाचे लोणचे, मिरचीचे लोणचे, आवळ्याचे लोणचे, हळदीचे लोणचे अशा विविध प्रकारचे लोणचे जेवणासोबत खायला आवडतात.

कोरफड ज्यूस 

आयुर्वेदामध्ये कोरफडीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे त्याचे फायदे आणि वाढणारी मागणी लक्षात घेऊन कोरफडी पासून ज्यूस बनविण्याचा व्यवसाय हा कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय ठरु शकतो.

ज्यूस बनवण्याची प्रक्रिया:

  • सर्वप्रथम पिकलेल्या कोरफडीचे पाने घेऊन ती स्वच्छ धुऊन घेतली जातात.
  • त्यानंतर कोरफडीच्या पानाची टोके कापून त्याच्या मधील जेल चमचा किंवा चाकूचा वापर करून बाहेर काढले जाते.
  • हे काढलेले जेल एका ब्लेंडरमध्ये घेऊन ते गुळगुळीत होईपर्यंत मिक्स केले जाते. 
  • या जेलची चव चांगली राहावी आणि ते जास्त काळ टिकावे म्हणून यामध्ये पेक्टीनेस, सायट्रिक ऍसिड आणि एस्कॉर्बिक ऍसिड मिसळले जाते.
  • नंतर हे मिश्रण फिल्टर करून विक्रीसाठी बॉटलमध्ये ठेवले जाते.

Laghu Udyog अशा प्रकारे छोटे पण अधिक उत्पन्न मिळवून देणारे व्यवसाय करून महिला वर्ग व ज्यांची उद्योजक व्हायची इच्छा आहे, असे आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top