Artificial intelligence आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे काय व AI चे उपयोग कोणते आहे ?

Share

Artificial intelligence तुमच्या डिव्हाइस वरील न्यूट्रल नेटवर्कचा अंदाज घेऊन तुम्हाला चांगले फोटो काढण्यात, वेगळी भाषा समजण्यास, संगीत ओळखण्यात आणि गेमिंग मध्ये मदत करण्यासाठी याला ऑन डिव्हाइस AI असे म्हणतात.

कुत्रिम उपयोगाने साधलेल्या लाभार्थक वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असेही म्हणतात. ‘एआय’अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने जणू सर्वांचे आयुष्य व्यापले आहेत. केवळ प्रयोगशाळा किंवा रोबोपर्यंत मर्यादित राहिले नाही. अत्यंत कठीण वाटणारे काम ‘एआय’चुटकी सरशी करू शकते.

‘ए आय’ मुळे दैनंदिन आयुष्यातील कामांमध्येही एखाद्या स्मार्ट असिस्टंट प्रमाणे तुम्हाला मदत करू लागले आहे.त्यामुळे तुम्हीही आणखी स्मार्ट बनू शकता.

Laghu Udyog कमी खर्चात सुरू करता येतील हे लघु प्रक्रिया उद्योग

Artificial intelligence AI चा विविध माध्यमांमध्ये उपयोग :

टॅक्स बुकिंग ॲप  –  एआय ॲप आधारित टॅक्सीने प्रवास करताना काही मिनिटात ड्रायव्हरला तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो.

त्यामध्ये रियल टाइमिंग असल्यामुळे ट्राफिक जास्त किंवा कमी दाखवले जाते त्यामुळे आपण ठरलेल्या वेळेनुसार ठरलेल्या ठिकाणी पोहोचू शकतो.

व्हॉइस असिस्टंट- फोन तसेच इतर डिवाइस मध्ये अलेक्सा सिरीज गुगल होम सारखे व्हॉइस असिस्टंट सूचना मिळतात पर्सनलाइज्ड पद्धतीने सर्च करतात. व्हॉइस असिस्टंट अचूकपणे युजर्सना मदत करीत असतात.

चॅटबाॅट्सची मदत – चॅटबाॅट्स कस्टमर केअर प्रमाणे अनेक कामे करतात. चॅटबाॅट्स हे मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर काम करतात.

विचारलेल्या शंकाचे निरसन करतात. या मदतीमुळे अनेक कामे सोपी होतात.

मनोरंजन ॲप्स- सर्व प्रकारच्या ॲप्स मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने युजर्स पाहत असलेल्या कंटेंट चे विश्लेषण करतात.

त्यानुसार पर्सनलाइज्ड कंटेंटची शिफारस करतात. कंपन्यांना हीच माहिती हवी असते.

फोटोची ओळख- गुगल लेन्स फीचर हे  मदतीने चालते. यामुळे युजरला एखादा फोटो, टेक्स्ट, लँडमार्कच्या आधारे सर्च करता येते त्या सारख्या दिसणाऱ्या इमेजेस चटकन शोधता येतात.

घोटाळ्याचा शोध- एआयच्या मदतीने रोजच्या व्यवहारावर देखरेख ठेवता येते आणि होणारा घोटाळा शोधून काढता येतो

त्यामुळे बँकिंग व्यवहार मध्ये होत असलेल्या गैर व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

नेव्हिगेशन ॲप्स- वाहनाने प्रवास करताना गुगल ॲपची मोठ्या प्रमाणात मदत घेतली जाते. हे ॲप्स ए आय तंत्रज्ञानाच्या आधारेच काम करीत असते.

यासाठी ए आय उपग्रहाने रिअल टाइम पाठवलेल्या माहितीची मदत घेते.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top