Sale Agreement of Property साठेखत म्हणजे काय? हे आहेत नोंदणीकृत साठे खत करण्याचे फायदे |

Share

Sale Agreement of Property  मालमत्तेचा व्यवहार करताना आपल्या कानावर हमखास पडते ते म्हणजे साठेखत.

या लेखामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की साठेखत म्हणजे काय आणि साठेखत कसे करतात.

लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर नक्की करा.

Sale Agreement of Property साठेखत म्हणजे काय 

मालमत्ता हस्तांतरण कायदा 1982 च्या कलम 54 अनुसार स्थावर मिळकतीचा विक्रीचा करार म्हणजे साठे खत. 

एखादी मालमत्ता ही भविष्यासाठी खरेदी करण्यासाठी जो करार केला जातो तो म्हणजे साठेखत.

साध्या शब्दात साठेखत म्हणजेच एखाद्या मालमत्तेचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा पुढच्या काही काळात करण्यात येणार आहे, त्याविषयी माहिती देणारे कागदपत्र. यालाच विसार, बेचनामा, किंवा वायदा पत्र असेही म्हटले जाते.

पौष्टिक तृणधान्य : नाचणीचे आहे आहारात महत्व !

एखाद्या मालमत्तेच्या मालकी हक्काचे भविष्यामध्ये हस्तांतरण होणार नाही याची माहिती देणारा करार म्हणजे साठेखत असतो.

एखाद्या व्यक्तीने मालमत्तेबाबत जर साठेखत करून घेतले तर त्या व्यक्तीचा खरेदी करण्यात येणाऱ्या मालमत्तेवर कोणताही मालकी हक्क हा सिद्ध होत नाही.

ज्यावेळी मालमत्तेची निबंध कार्यालयात नोंदणी प्रक्रिया पार पडते आणि खरेदीदाराला व्यवहाराचं रीतसर खरेदीखत दिलं जातं, त्याचवेळी त्या मालमत्तेवर खरेदीदार आपला हक्क सिद्ध करू शकतो.

Sale Agreement of Property हे आहेत नोंदणीकृत साठे खताचे फायदे: 

शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरती साठी खत करता येऊ शकते. परंतु शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेले साठेकर हे नोटरी मध्ये कायदेशीर पुरावा म्हणून गृहीत धरले जात नाही.

शासकीय अभिलेखांमध्ये अशा प्रकारच्या साठी खताची नोंद करता येत नाही.

दुय्यम निबंधक कार्यालयात साठेखत करता येऊ शकते दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात येणाऱ्या साठे खताला नोंदणीकृत साठे खत असे म्हटले जाते.

ज्यावेळी नोंदणीकृत साठेखत केले जाते, त्यावेळी खरेदी दाराला मालमत्तेचे पूर्ण मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. कायदेशीर दृष्टीने हे फायदेशीर ठरते.

एखादा खरेदीदार नोंदणीकृत साठेखत करतो, त्या खरेदीदाराला ज्यावेळी प्रत्यक्षात खरेदी होते तेव्हा मुद्रांक नोंदणी शुल्क भरावे लागत नाही. 

How to Improve CIBIL Score सीबील स्कोर कसा सुधारावा?

जर एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत साठे खत केले आणि पुढे काही कारणास्तव मालमत्तेची खरेदी होऊ शकली नाही. तर अशावेळी दुय्यम निबंधकाकडे रीतसर अर्ज करून अशा प्रकारचे साठे खत रद्द करता येऊ शकते.

संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली की त्यानंतर खरेदी दाराला त्याने भरलेले नोंदणी शुल्क परत मिळते.

साठे खतामध्ये काय नमूद केलेले असावे 

मालमत्ता विक्री आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तींची नावे आधार क्रमांक मोबाईल नंबर पत्ता याची माहिती साठेखतामध्ये नमूद केलेली असावी.

मालमत्तेचे ठिकाण क्षेत्रफळ व गट नंबर त्याचप्रमाणे मालमत्तेच्या चारही बाजूंना काय आहे अशा प्रकारची मालमत्तेचा तपशील नमूद असावा 

विक्रेत्याला खरेदी दाराकडून ठरलेली रक्कम कोणत्या स्वरूपात आणि किती कालावधीमध्ये देण्यात येणार आहे याचा तपशील.

ज्या दिवसापासून साठेखत केले आहे त्या दिवसापासून साठे खताची कधीपर्यंत प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल ते.

खरेदी विक्रीचा व्यवहार जर या कालावधीमध्ये पूर्ण झाला नाही तर काय परिणाम होतील 

साठेखत करतेवेळी काही रक्कम ही आगव स्वरूपामध्ये देण्यात आले आहे का 

विक्री करणारी व्यक्ती कोणत्या कारणासाठी मालमत्ता विक्री करत आहे, मालमत्तेवरती कोणते कर्ज आहे का किंवा कोणता बोजा आहे का, त्याचप्रमाणे मालमत्ते संदर्भात कोर्टामध्ये काही केस चालू आहे, वाद चालू आहे का याची माहिती.

मालमत्ता विक्री करणारी व्यक्ती ही त्या मालमत्तेचा पूर्ण मालक आहे की नाही ते पाहणे यासाठी मालमत्तेचा वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेता येतो.

विक्री होत असलेल्या मालमत्तेबाबत आधी साठेखत केले होते का, व्यवहार झाला होता का. 

कोणत्या परिस्थितीमध्ये साठेखत केले जाते? 

बऱ्याच वेळा काही व्यवहार हे मोठ्या स्वरूपात असतात म्हणजेच 50 लाख ते काही कोटी रुपयांमध्ये असतात अशावेळी खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण रक्कम उपलब्ध नसते. त्यावेळी विसार म्हणून काही पैसे दिले जातात आणि उर्वरित रक्कम नंतर टप्प्याटप्प्याने द्यायचे असे ठरले जाते. अशावेळी खरेदीदार आणि विक्री करणारी व्यक्ती यांच्यामध्ये साठेखत केले जाते. 

काही वेळेस मालमत्ता खरेदी करण्यासाठी खरेदीदाराकडून कर्ज घेतले जाते अशावेळी कर्ज घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर ही मालमत्तेची कागदपत्रे असणे आवश्यक असते.  अशावेळी साठेखत हे केले जाते. 

साठेखत केल्यामुळे खरेदी दाराला कर्ज मंजूर होते आणि ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये रजिस्ट्रीची प्रक्रिया पूर्ण होते, त्यावेळी खरेदीदाराला ती कागदपत्रे कर्ज देणाऱ्या संस्थेमध्ये जमा करावी लागतात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top