Model Code of Conduct आचारसंहिता म्हणजे काय ? सामान्य व्यक्तींवर काय परिणाम होतो ?

Share

Model Code of Conduct सध्या महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहे. यासाठी आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या लेखात आपण आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता लागू करण्याची गरज काय, आचारसंहिता लागू झाल्या नंतर कोणते नियम आहेत, याची माहिती घेणार आहोत.

लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

मोफत माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Model Code of Conduct आचारसंहिता म्हणजे काय?

देशातील निवडणूका ह्या स्वतंत्र आणि निपक्षपातीपणे पार पडाव्या यासाठी निवडणूक आयोगाकडून काही नियम घातले जातात. त्या नियमांना आचारसंहिता म्हटले जाते.

जे पक्ष आणि उमेदवार निवडणुकीमध्ये सहभागी होतात, अशा सर्व पक्षांना आणि उमेदवारांना आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे.

Book Reading कोणत्या वयात कोणती पुस्तके वाचावीत.?

आचारसंहिता लागू झाल्यानंतर एखाद्या पक्षाने किंवा उमेदवाराने आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केले, तर अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.

जे उमेदवार आचारसंहिता नियमांचे उलंघन करते अशा उमेदवाराला निवडणूक लढवण्यास मनाई केली जाऊ शकते.

गुन्हा जर जास्त गंभीर असेल तर अशा वेळी कायदेशीर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

निवडणूक आयोगाने वेबसाइट वर आचारसंहिता नियमांविषयी माहिती दिलेली आहे. निवडणूक लढवणारा उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांचे वर्तन कसे असावे याबाबत माहिती दिलेली आहे.

त्याचप्रमाणे रॅली, प्रचारसभा, मिरवणुका याबाबत असलेल्या अति कोणत्या आहे, याची माहिती वेबसाइट देण्यात आलेली आहे.

मतदानाच्या दिवशी उमेदवार काय करू शकतात, तसेच उमेदवार किंवा पक्षाचा निवडणुकीच्या दिवशी व्यवहार कसा असावा, निवडणूक कालावधीत सत्ताधारी पक्षाची काय भूमिका असावी, अशा विविध नियमांचा समावेश आचारसंहितेमध्ये आहे.

आचारसंहिता लागू जल्यानंतरचे नियम काय आहेत?

कोणत्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल, तर पोलिसांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

सरकारी, बंगला, सरकारी गाडी, किंवा सरकारी विमानाचा वापर हा निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे.

जो सत्ताधारी पक्ष आहे, त्या पक्षाला आचारसंहिता कालावधीत कोणत्याही प्रकारची सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येणार नाही.

प्रचारादरम्यान जातीय तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्यास उमेदवारांना मनाई आहे.

एखादा राजकीय पक्ष किंवा पक्षाचा उमेदवार मते मिळवण्यासाठी जात, धर्म यांचा आधार घेऊन मतदारांना मत देण्याचे आवाहन करू शकत नाही.

ज्या दिवशी मतदान असते त्या दिवशी दारूची दुकाने बंद असतात. मतदानाच्या दिवशी किंवा प्रचार चालू असताना मतदारांना पैसे किंवा दारू वाटण्यास मनाई आहे.

मतदानाचे बूथ साधे लावलेले असतात. या दिवशी बूथ वर प्राचर्सहित्य अथवा मतदारांना भुलवणारी कोणतीच गोष्ट असायला नको. राजकीय पक्ष किंवा उमेदवाराकडून मतदारांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली नसावी.

एखाद्याच्या घरावर, भिंतींवर किंवा जागेवर राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर किंवा पत्रक लावायचे असतील तर संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी प्रचार करता येत नाही.

प्रचाराचा अवधि संपल्यानंतर प्रचार करणे, मतदारांना धमकी देऊन घाबरावे, पैसे वाटणे, बोगस मतदान, मतदान केंद्रपर्यंत मतदारांना घेऊन जाणे किंवा परत आणणे, मतदारांच्या जाण्या-येण्याची सोय करणे, यासाठी बंदी आहे.

निवडणूक आयोगाकडून राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती केली जाते.

अशी झाली आचारसंहितेची सुरुवात

1960 साली झालेल्या केरळ विधानसभा निवडणुकांपासून आचारसंहितेची सुरुवात झाली. राजकीय पक्षांच्या सहमतीने आचार संहिता तयार करण्यात आली.

आचारसंहितेची अंमलबजावणी ही 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत करण्यात आली. यामध्ये नवीन नियम आणि नव्या गोष्टी जोडल्या जाऊ लागल्या.

आचार संहितेमधील काही नियम हे आयपीसीच्या कलामांच्या आधारे लागू करण्यात येतात.

अनेकदा आपण बघतो की कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवारावर किंवा राजकीय पक्षावर आचार संहिता भंगाची कारवाई केली जाते. राजकीय पक्ष किंवा उमेदवार आचार संहिता नियमांना गांभीर्याने घेत नाही त्यामुळे त्यांना कारवाईला सामोरे जावे लागते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top