आत्मविश्वास (Self Confidence) १० पटीने वाढवण्यासाठी ७ सोपे नियम

Share

माणसाला आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल, तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास (Self Confidence) असणे खूप गरजेचे आहे. सद्या ह्या धावपळीच्या जगात एवढी स्पर्धा वाढली आहे कि आजच्या घडीला आत्मविश्वास (Self Confidence) नसणाऱ्या माणसाला ह्या जगात काहीच किंमत नाही.

आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मविश्वास गरजेचा आहे. तरी सुद्धा अनेक लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला ७ एकदम सोप्या युक्त्या सांगणार आहे. ज्या तुम्ही आमलात आणल्या, तर तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होईल. ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. प्रत्येक युक्ती आयुष्य बदलवनारी आहे. म्हणून तुम्हाला विनंती करेल, कि हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

१. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणे –

मित्रांनो तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे ज्या गोष्ठी आहे, त्या बद्दल कृतज्ञ राहतात तुम्हाला कोणी मदत केली असती. त्या बद्दल कृतज्ञ राहतात. त्या वेळेस तुम्ही आयुष्यामध्ये काय काय यश मिळवले आहे. ह्या गोष्टींकडे तुमचे लक्ष्य जाते आणि अश्याने आपसूकच तुमचा आत्मविश्वास वाढतो.

कृतज्ञ राहणे म्हणजे काय? ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आहे. त्या सर्व गोष्टींबद्दल देवाचे किंवा निसर्गाचे आभार मानणे.

ह्या धावपळीच्या जगामध्ये आपले सगळे लक्ष्य फक्त काय हवे आणि काय नको ह्याकडेच राहते. पण जेव्हा आपल्याकडे काय काय चांगल्या गोष्टी आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहायला सुरुवात करतो जेव्हा आपला आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते.

२. कामाची चालढकल करण्याची सवय सवय बंद करा-

अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे कि ज्या माणसाला काम-ढकल करण्याची सवय असते, त्या माणसामध्ये आत्मविश्वास (Self Confidence) ची कमतरता असते. माणसाचा एक स्वभाव असतो अवघड कामांना टाळायचे आणि सोप्या कामांना करायचे. पण जी कामे अवघड असतात, त्याच कामामध्ये प्रगती दडलेली असते. सकाळी लवकर उठणे अवघड काम आहे, पण त्यामध्ये प्रगती आहे.

T.V.बघण्यापेक्षा २ तास शिकण्यासाठी देणे अवघड आहे. पण तिथे प्रगती आहे. फास्टफूड खान्याऐवजी आरोग्यदायी आहार घेणे, अवघड आहे. पण परत त्यामध्ये प्रगती आहे. थोडक्यात काय माणूस आपल्या हिताची कामे चालढकल करत असतो.

एकदा ही चालढकल करण्याची सवय बंद केली, तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची सवय होईल. “मी करू शकतो” ही धारणा निर्माण होते.

३ आपल्या क्षमता वाढवा आत्मविश्वास (Self Confidence) वाढेल

मित्रांनो जेव्हा आपण नवीन नवीन गोष्टींचे ज्ञान ग्रहण करतो, नवीन नवीन गोष्टी शिकतो, अभ्यास करतो तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या क्षमता विकसित व्हायला सुरुवात होते आणि ज्या वेळेस आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण विकसित होतात. तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते.

जी आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाला, दु:खाला तोंड देण्यासाठी मदत करते. म्हणून आपण अट्टाहासाने सतत आयुष्यामध्ये काहीतरी शिकत राहिले पाहिजे ज्यामुळे आपल्यामध्ये आत्मबल आणि आत्मविश्वास तयार होतो.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

४. गरजूंची मदत करा-

जगामध्ये गरजूंची मदत करून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला ह्याची जाणीव होते, कि तुम्ही लोकांच्या उपयोगी येऊ शकतात. त्या वेळेस तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तुम्ही ह्या जगात उपयुक्त आहात. हि जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुमच्या आयुष्याला १ अर्थ प्राप्त होतो. इथे मला स्वामी विवेकानंदांचा १ सुविचार सागूशी वाटतो.

जे दुसर्‍यांसाठी जगतात, तेच खऱ्या अर्थाने जिवंत आहे, बाकीचे जिवंत असूनसुद्धा मृत आहेत.

स्वामी विवेकानंद

म्हणून आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसर्यांची मदत करणे. हा सुद्धा१ सोप्पा मार्ग आहे.

५. छोटे आणि पूर्ण करता येण्यासारखे ध्येय ठेवा आत्मविश्वास वाढेल

अनेक वेळा लोक असंख्य आणि आवाढव्य जे वास्तवतेला धरून नसतात, अशी ध्येय ठेवतात अशी ध्येय ठेवल्यामुळे अनेक लोक सुरुवातच करत नाही आणि सुरुवात केली तर अर्ध्यातच ध्येय सोडून देतात आणि अर्धवट सोडलेली कामे आपला आत्मविश्वास (Self Confidence) कमी करण्याचे काम करतात.

त्यामुळे सुरुवातीला कमी, छोटी छोटी आणि पूर्ण करता येण्या जोगी ध्येय ठेवा आणि महत्वाच्ये म्हणजे ती पूर्ण करा. कारण जेव्हा कोणतेही काम तुम्ही पूर्ण करता, तेव्हा तुमच्यामध्ये एक विजेत्याची भावना निर्माण होते. कि हो जे काम मी ठरवले होते ते पूर्ण केले आणि अश्या प्रकारे ज्या वेळेस तुम्ही ठरवलेली कामे पर्ण करत जाल, तेव्हा तुमच्या आत्मविश्वासाचा आलेख हळूहळू वर जात जाईल.

६. नेहमी positive लोकांबरोबर राहायचा प्रयत्न करा-

मित्रांनो अट्टाहासाने तुम्ही positiveलोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. असे म्हणतात “जशी संगत, तशी जीवनाला रंगत “ ज्या वेळेस तुम्ही positive लोकां सोबत राहायला सुरुवात करतात, तेव्हा तुमचे विचार सुद्धा त्यांच्यासारखे positive व्हायला सुरुवात होते आणि मनात positiveविचार यायला सुरुवात झाली कि आत्मविश्वास आपोआप निर्माण व्हायला सुरुवात होते.

७. रूबाबात राहा, स्वत:ची काळजी घ्या-

मित्रांनो ज्यावेळेस मी म्हणतो रुबाबात राहा ह्याचा अर्थ तुम्हाला अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान सारखी दिसण्याची गरज नाही किंवा जास्त मेकअप करण्याची गरज नाही.

रूबाबात राहणे म्हणजे स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालणे, शरीर स्वच्छ ठेवणे, केस व्यवस्थित ठेवणे ज्यामुळे तुम्हाला स्वतःला तुमच्याबद्दल छान वाटले पाहिजे.

म्हणजे तुमच्या स्वत:च्या नजरेत स्वत: बद्दल आदर निर्माण झाला पाहिजे. स्वत:ची काळजी घेणे म्हणजे रोज ७ -८ तास झोप घेणे नियमित व्यायाम करणे, आरोग्यदायी जेवण जेवणे, ज्यामुळे तुमचे शरीर धष्टपुष्ट राहील, चांगली शरीरयष्टी आणि प्रसन्न मनस्तीती प्रचंड आत्मविश्वास निर्माण करायला मदत करते.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top