Insult अपमानाचा बदला कसा घ्यायचा ?

Share

Insult मित्रांनो, मला खूप जन सांगात असतात की आम्हाला आयुष्यात खूप पुढे जायचे आहे. पण लोक आम्हाला नाव ठेवतात. आमचे खच्चीकरण करतात, आमचा अपमान(Insult) करतात, त्यामुळे आम्हाला खूप नैराश्य येत. आम्ही स्वतःला कमी समजतो. असे जर तुमच्या बरोबर होत असेल, तर आजची पोस्ट तुमच्यासाठी आहे.

आजच्या पोस्ट मध्ये मी रतन टाटा यांच्याविषयी एक जबरदस्त गोष्ट सांगणार आहे. ती ऐकून तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होईल. तुमच्या रागाचे संधीत रुपांतर कसे करायचे? हे तुम्हाला कळेल. तुमचा कोणी अपमान(Insult) करत असेल, तर त्याचे यशाने उत्तर कसे द्यायचे हे कळेल. त्यासाठी हि पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो, रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ मुंबईमध्ये झाला. रतन टाटा हे टाटासमुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे नातू त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई आणि शिमला येथे झाले. नंतर त्यांनी (Advanced Management Degree)Hardware Buisness School America) इथून घेतली. १९६१ साली त्यांनी टाटा ग्रुप मध्ये काम करायला सुरुवात केली.

१९९१ साली जमशेदजी टाटा हे Chairman या पदावरून निवृत्त झाले आणि मग टाटा समुहाचे चेअरमन पदाची जबाबदारी रतन टाटा यांच्यावर सोपवण्यात आली. आपल्या २१ वर्ष्याच्या चेअरमन पदाच्या कारकि‍र्दीत रतन टाटानी कंपनीचा Revenue ४० % वाढवला आणि कंपनीचा ‌Profit ५० % वाढवला.

आज टाटा कंपनीचा बिजनेस १०० देशांमध्ये पसरला आहे. १९९८ साली रतन टाटा यांच्या टाटा मोटर्स(Tata motors) कंपनीने Indica car मार्केट मध्ये आणली. पण मार्केट मध्ये हि कार अजिबात चालली नाही. एक्स्पर्टला कार मध्ये बरेच दोष आढळले. त्यामुळे हा पॅसेंजर कारचा (passenger car) प्रोजेक्ट पूर्णपणे फसला.

कंपनीला खूप मोठे नुकसान झाले त्यावेळेस कंपनीतल्या हिस्सेदारांनी रतन टाटा यांना विनंती केली. आपण हि कंपनी विकली तर बरं होईल. मग इच्छा नसताना सुद्धा रतन टाटा (Ratan Tata) यांनी कंपनी विकायचा निर्णय घेतला आणि त्यांनी Ford या कंपनीकडे कंपनी विक्रीचा प्रस्थाव पाठवला.

रतन टाटा आणि त्यांचे सहकारी हा प्रस्थाव घेऊन डेट्रॉईट अमेरिका (Detroit America) जिथे फोर्ड (Ford) कंपनीचे मुख्य कार्यालय आहे तिथ गेले. तिथे त्यांच्या कंपनीबरोबर दोन तास मिटींग चालली. पण फोर्डच्या मॅनेजमेंट च्या लोकांनी रतन टाटा यांच्या कंपनीची खूप चेष्टा केली.

कंपनीचा मुख्य अधिकारी बिल फोर्ड (Bill Ford) रतन टाटाना म्हणाला, तुम्हाला कार बद्दल काही माहित नाही, तर कशाला या व्यवसायामध्ये पडला ? तुम्हाला माहिती आहे का ?कि आम्ही तुमची हि कंपनी विकत घेऊन तुमच्यावर किती मोठे उपकार करत आहोत.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हि गोष्ट रतन टाटा यांना खूप जिव्हारी लागली ते लगेच आपल्या सहकार्यां सोबत मुंबईला परतले त्यांनी डील cancel केली आणि ठरवले कि आता कंपनी कोणालाच विकायची नाही. मग त्यांनी कंपनी मध्ये झालेल्या चुका शोधायला सुरुवात केली थोडी जास्त मेहनत घेऊन इंडिकाचे नवीन मॉडेल मार्केट मध्ये आणले आणि ते मॉडेल मार्केट मध्ये खूप यशस्वी झाले.

असे करत करत टाटानी आजून वेगवेगळ्या पद्धतीच्या कार मार्केट मध्ये आणल्या त्यांना यश मिळू लागले. टाटा मोटर्स प्रगती करू लागली. पण इकडे Ford कंपनी हळूहळू लॉस मध्ये जाऊ लागली. २००८ च्या मंदी मुळे फोर्ड कंपनी अक्षरश: दिवाळखोरीत निघाली. मग या नुकसानीतून वाचण्यासाठी फोर्ड कंपनीने आपल्या लक्झरी कार्स जग्वार आणि लॅन्ड रोवर (Jagwar and Land Rover) या brand विकायला काढल्या.

ज्या जास्तच लॉस मध्ये होत्या.हि बातमी मार्केटमध्ये अक्षरशा वेगामध्ये पसरली.मग रतन टाटा यांनी हे ब्रंड विकत घेण्याचा प्रस्थाव ठेवला. तो प्रस्थाव एवढा मोठा होता कि, फोर्ड कंपनीला नाही म्हणताच आले नाही.मग बिल फोर्ड आणि त्याचे सहकारी डेट्रॉईट अमेरिका वरून आताच्या मुख्य हाउस मध्ये भेटायला आले.

रतन टाटानी jagwar आणि land rover हे ब्रंड ९३ हजार करोड मध्ये खरेदी केले आणि मग तोच Bill Ford ज्याने रतन टाटा यांचा अपमान केला होता, तो म्हणाला jagwar आणि land rover हे brands घेऊन तुम्ही आमच्या वर खूप मोठे उपकार करत आहात.हे ऐकून रतन टाटा यांनी एक छानसं हास्य देऊन त्याच्याशी हात मिळवला.

त्यांना उलट उत्तर देता आले असते, पण रतन टाटा हे जमिनीवर होते. त्यांच्या डोक्यातून यशाची हवा गेली नव्हती. आज jagwar आणि land rover हे brands टाटा समुहाचे आहे आणि चांगला नफा कमावून देत आहे.

मित्रांनो, ह्या प्रसंगावरून आपल्याला बर्याच गोष्टी शिकायला मिळतात.

१. जर आयुष्यात तुम्हाला कोणी कमी लेखत असेल(Insult),तर त्याला उत्तर हे रागावून नव्हे,तर स्वतःला सिध्द करून द्यावे.असे केल्याने तुमची प्रगती होते.

२ -ह्या जगात कोणालाही कमजोर समजू नये,उद्या कोण कधी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर शिखर गाठेल सांगता येत नाही.

३ -उद्या कितीही तुम्ही यश मिळवले तरी तुमचे पाय जमिनीवर असु द्यावे,नाहीतर अहंकार हि अशी गोष्ट आहे,ज्याने मोठमोठ्या लोकांना उंची वरून जमिनीवर आणले आहे .

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top