Book Reading कोणत्या वयात कोणती पुस्तके वाचली पाहिजे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
१. १० वर्ष्यापर्यंतची मुले-
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हि खूप महत्त्वाची वेळ असते. १० वर्ष्याच्या आतील मुल हे नेमकेच वाचायला शिकत असतात.
या वयात जर त्यांना पुस्तके आवडायला लागली. तर हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यभराची सवय होवून जाते. म्हणून या वयातील मुलांच्या हातात पुस्तके दिलीच पाहिजे.
पण मोठी आणि थोडी अवघड भाषा असणारे पुस्तक त्यांना झेपणार नाही.म्हणून त्यांना मोठे आणि ठळक अक्षरे असणारे भरपूर चित्रे असणारी,कथा,कविता,चित्रकथा,बडबड गीते यांसारखी पुस्तके द्यावीत.
सोबतच चित्रमय कथा असणारे रामायण,महाभारत,अरेबियन नाईट्स,टारझन यासारखे मनोरंजन असणारे सोबतच नैतिक मुल्ये शिकवणारे पुस्तके वाचायला दिली पाहिजेत.या वयातील मुले चंपक,चांदोबा,यासारखे मासिके पण वाचू शकतात.हा सुरुवातीचा पण सर्वात महत्वाचा एजग्रुप आहे.
२. वय १० वर्ष ते १८ वर्ष-
या वयातील मुल हळूहळू मोठे होत वयात येत असतात.त्यांना शाळा,परीक्षा यांकडे लक्ष्य द्याव लागत.तरून वयातील आपले व्याक्तीम्ह्त्व याच वयात घडत जाते.
म्हणूनच या वयात इतिहास,प्रेरणादायी चरित्र,विज्ञानकथा यासारखे पुस्तके वाचलीत पाहिजे.नातेसंबध,भावनिक पुस्तके या काळात वाचावीत.
जसे कि वप्पू काळे,सुधा मूर्ती यांचे पुस्तक.successful लोकांचे चरित्र,आत्मचरित्र या वयात जास्त परिणामकारक असतात.ते वाचावीत.
सोबतच तुम्ही या वयात मराठीतील काही मास्टरपीस म्हटली जाणारी पुस्तके एक वेळेस तरी वाचली पाहिजे. जसे कि पाटलन, मृतुंजय, श्यामची आई, पानिपत, कोसला, फकीरा, युगंधर इत्यादी.
ज्याला रोमांचक अस काही वाचायला आवडत त्यांनी हॅरी पॉटर, शेरलॉक होम, आगता क्रीस्ठी यांची थोडीफार पुस्तके वाचू शकतात. पण फक्त थोडीफारच.
३. वय १८ ते २८ वर्ष-
या वयातील लोक कॉलेज संपवून नोकरीच्या मागे लागलेले असतात. तर काही लोक आपल्या आवडीच्या विषयात स्पेशलायझेशन करतात. त्यांनी आपले पद, अभ्यासाव्यतिरिक्त पण विषयाच्या संबंधित संदर्भ ग्रंथ वाचावीत.
आपल्या फिल्डच्या संबंधित लोकांचे आत्मचरित्र वाचावीत म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्रातील सखोल माहिती मिळेल.
या वयात स्पेशली सेल्फ हेल्प या प्रकारातील बिजनेस बुक, करिअर बुक, या प्रकारातील पुस्तके जास्त वाचावीत. ज्याचा तुमच्या लाईफ मध्ये प्रत्यक्ष काय फायदा मिळतो.
जसे कि रिच डॅड पुअर डॅड, द सिक्रेट, द अल्कीमेट, बिलीव्ह इन युअर सेल्फ, यासारखी पुस्तके. सोबतच या वयात तुमच्या धर्म आणि तत्वज्ञान या क्षेत्रातील काही संकल्पना क्लीअर असायला पाहिजे.
म्हणून तुम्ही तत्वज्ञान आणि धार्मिक मधील काही वाचू शकतात. या वयात तुम्ही व. पु. काळे, डॅन ब्राऊन, आगस्था क्रीस्ठी, शिरवळकर, नेमाडे हे थोडेफार वाचायलाच पाहिजे.
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
४. वय २८ ते ४५ वर्ष-
वय २८ ते ४५ वर्ष या वयातील लोक हे जीवनात स्थिर झालेले असतात.आर्थिक आणि सांसारिक जीवनात ते थोडेफार सेट असतात.म्हणून हे लोक मनोरंजक या साहित्यातील प्रकार वाचू शकतात.
या वयात रहस्य कथा, भावकथा, प्रणयकथा, कादंबर्या, यासारखी पुस्तके वाचावीत. या वयोगटातील लोकांनी आपल्या आवडत्या प्रकारातील लेखकांचे पुस्तके वाचवेत.
पण त्यासोबत थोडे फार आर्थिक नियोजना संबंधी पुस्तके वाचावीत.गुंतवणूक आणि शेअर मार्केट संबंधी वाचन करावे.ज्याचा त्यांना त्यावेळी काहीतरी फायदा मिळू शकतो.
५. वय ४५ वर्ष्याच्या पुढील लोक-
४५ वर्ष वयाच्या आयुष्यात दगदग थोडी कमी झालेली असते. या वयात लोकांकडे थोडा जास्तीचा वेळ असतो. म्हणून ते मोठमोठे साईजचे आणि आवडीचे पुस्तके वाचू शकतात.
मनोरंजन करणारे हलके फुलके कथा, कादंबरी यासारखे पुस्तके वाचू शकतात. या वयातील लोकांनी प्राचीन धर्म ग्रंथ, पुराणकथा इतर धर्मांचे धर्मग्रं, राजकीय, ऐतिहासिक पुस्तके वाचावीत.
राजकीय विश्लेषण करणारी पुस्तके वाचावीत.इतिहासिक प्रकारातील साहित्य वाचावीत.
या वयोगटातील लोकांनी आपल्याला मिळालेल्या फावल्या वेळचा वापर करून मोठे आभ्यास पूर्ण प्रकारचे वाचन करावे.
हे वाचले का?
- बंदुक लायसन्स कसे बनवावे.
- ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?
- आमदार निधीचा हिशोब मागावा
- LPG गॅस ग्राहकांचे अधिकार
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा