मित्रांनो असे म्हणतात, कि जगातील ९०% संपत्ती जगातल्या फक्त १०% लोकांकडे आहे. आणि १०% संपत्ती जगातल्या ९०% लोकांकडे आहे. असे चित्र का आहे? जगातले फक्त १०% लोक यशस्वी आणि श्रीमंत आहे आणि बाकीच्या लोकांची आयुष्य जगण्यासाठी धडपड चालू आहे .ह्या लेखात आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल काय करायला हवे याचे उत्तर कळेल.
तुम्हाला मी एक अशी गोष्ट सांगणार आहे ,ज्याचे मर्म तुम्हाला समजले तर तुमच्या आयुष्यात कमालीचा बदल घडू शकतो आयुष्यात मोठे व्हायचे असेल. चला तर मग सुरु करूया. नमस्कार आपले माहिती हवी या वेबसाइटवर सर्वांच स्वागत आहे.
एक साधू आपल्या शिष्याबरोबर चाललेला असतो .त्यांना एक गाव लागते .खूप दुपार झाल्यामुळे सूर्य डोक्यावर आलेला आसतो .त्यांना खूप तहान लागलेली असते. ते एका शेतात येता. शेती चांगली उपजाऊ दिसत होती त्यांना. पण त्याच्यात काही धनधान्य लावलेले नव्हते. बरेच वर्ष ते असेच पडून होते. शेताच्या मधोमध त्यांना एक घर दिसले. ते जाऊन घराचा दरवाजा वाजतात. एक माणूस दरवाजा उघडतो .ते म्हणतात आम्हाला खूप तहान लागलेली आहे. पाणी मिळेल का ?
तो माणूस त्यांना पाणी आणून देतो. तेवढ्यात त्या माणसाचे २ मुले आणि बायको येते .त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या अंगावर फाटके-तुटके कपडे असतात. तो साडू त्या माणसाला विचारतो, शेतातून काही उगवले नाही, मग तुमचे घर कसे चालते? तो माणूस म्हणतो, शेत माझेच आहे पण आमच्याकडे एक म्हैस आहे. ती दुध देते त्या दुधाची विक्री आम्ही करतो आणि कस-बस यात आमचे घर चालत.
अशा गप्पा मारता मरता संध्याकाळ होते. तो साधू आणि त्याचा शिष्य तिथेच राहतात. मध्यरात्री साधू आपल्या शिष्याला उठवतो आणि म्हणतो आपल्याला लगेच निघायचय. तो त्याच्या शिष्याला सांगतो, बाहेर जी म्हैस बांधलेली आहे तिला पण बरोबर घे. शिष्याला काही कळत नाही पण, गुरु आज्ञा म्हणून तो म्हशीला सुद्धा बरोबर घेतो आणि मग शेकडो मेेल गेल्यानंतर त्यांना एक जंगल लागते. साधू आपल्या शिष्याला सांगतो, ह्या म्हशीला इथच सोडून दे.
शिष्याला काही कळत नाही. कारण ह्या माणसाचे घर, त्याचे मुलबाळ ह्या म्हशीवर चालले होते. ती म्हैस आता जंगलात जाणार होती. पण परत गुरु आज्ञा मानून तो त्या म्हशीला जंगलात सोडून देतो. या गोष्टीला १० वर्ष उलटून जातात. तो शिष्य साधुकडून शिक्षा घेऊन खूप मोठा होतो प्रगती करतो. पण त्याच्या मनात एक खतखत कायम असते कि आपण एका माणसाचा संसार उध्वस्त केला.
मग तो प्रायश्चित्त करण्यासाठी तो आपली गाडी घेऊन त्या माणसाच्या गावात येतो. गावात आल्यानंतर ज्या शेतामध्ये ते राहिले होते, खूप साऱ्या वेगवेगळ्या फळांची झाडे दिसतात. त्या माणसाला वाटते म्हैस विकल्यामुळे त्या माणसाने जी जमीन दुसऱ्याला दिली असेल. असा विचार करून तो तिथून जायला लागतो.
तेवढ्यात त्याला तोच माणूस दिसतो .तो त्याला जाऊन भेटतो मला ओळखलं का? मी १० वर्षापूर्वी माझ्या गुरु सोबत तुमच्या इथे राहायला आलो होतो. तो माणूस म्हणतो कसा विसरेल मी ती रात्र ?तुम्ही त्या रात्री न सांगताच निघून गेला आणि नेमके त्याच रात्री आमच्या गावात चोर आले होते. जे आमच्या म्हशीला सुद्धा चोरून घेऊन गेले.
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
म्हैस चोरीला गेल्यामुळे आमच्या घरच्यांचे खूप हाल झाले. पहिले काही दिवस मला कळलेच नाही काय करावे? खुप दु:खात दिवस गेले .पण काही केळेना? पण काही पर्याय नव्हता. मग मी मेहनत करायला सुरुवात केली. लाकडे तोडून विकायला सुरुवात केली. थोडे पैसे यायला लागले. त्या पैश्याचे शेतात धनधान्य लावले खूप चांगले पिक आले. चांगले पैसे मिळाले त्या पैशातून शेतात वेगवेगळ्या फळांची झाडे लावली झाडे चांगली फळे देऊ लागली मी आजून झाडे लावली.
आता मी जिल्ह्यातला खूप मोठा व्यापारी आहे. मी खूप श्रीमंत झालो आहे मग तो शिष्य विचारतो, हे तुम्ही आधी पण करू शकला असता? तो म्हणतो आधी म्हैस असल्यामुळे मी पांगळा झालो होतो .मला वाटत होत सर्व काही ठीक चालू आहे .पण म्हैस चोरीला गेल्यामुळे काही पर्याय नव्हता आणि दोन वेळेस जेवण सुद्धा मिळाले नसते आम्हाला.
त्यामुळे आयुष्यात मोठे व्हायचे असेल खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ मला आज भेटले आहे .मी त्या चोरांचा आभार मानतो कि, ज्यांनी माझी म्हैस चोरली. नाहीतर मी आज सुद्धा तेच दरिद्री जीवन जगत असतो. मित्रांनो, हि गोष्ट आपल्याला विचार करायला लावते कि, आपल्या पण आयुष्यात एखादी म्हैस नाही ना ? जिच्यावर आपण विसंबून असतो. जी आपल्याला प्रगती करून देत नाही.
आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर अशी म्हैस असेल तर आत्ताच वेळ आली आहे. आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकण्याची. काहीतरी नवीन करायची, काहीतरी मोठे करायचे असेल? तर चौकटीच्या बाहेर जाऊन काही गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही म्हणाल हे बोलायला लई सोप्पय. हो तुमचं बरोबर आहे. पण जर तुम्हाला असामान्य व्हायचं असेल तर हे करावच लागेल. नाहीतर सामान्य जीवन जगायला तयार रहा.
महेंद्र सिंघ धोनी यांनी टी. सी. चागव्हर्मेंटचा जॉब सोडला नसता तर आज भारतीय क्रिकेटला चांगला कर्णधार भेटला नसता. नरेंद्र मोदी लहानपणी फक्त चहा विकत राहिले असते, तर ते आज देशाचे पंतप्रधान झाले नसते. धीरूभाई अंबानिनी पेट्रोल पंपावरची नोकरी सोडली नसती, तर आपल्याला रिलायन्स चे साम्राज्य दिसले नसते.
असे अनेक उदाहरणे आहे कि ,ज्यांनी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन नवीन गोष्टी केल्या आणि यशस्वी झाले .अस नाही कि त्यांना अपयश नाही आले. पण प्रत्येक अपयशाचा सामना करत ते तुढे जात राहिले. संकटाचा धैर्याने सामना केला.
तुम्हाला पण आयुष्यात काहीतरी चांगले करायचे सेल तर कम्फर्ट झोनच्या बाहेर याव लागेल. जबरदस्त प्रयत्न करावे लागतील. मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही .
हे वाचले का?
- पोलीस लाठीचार्ज: किती कायदेशीर, किती बेकायदेशीर ?
- Petrol Pump वरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार
- HUMAN RIGHTS COMMISSION कडे तक्रार कशी करावी?
- वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा