१२ वीपर्यंतचे शिक्षण हे शालेय विभागात गणले जाते. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश १२ वीनंतर दिले जातात. १२वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना काही विशिष्ट विषय १२वीमध्ये विद्यार्थ्यांनी घेणे हे आवश्यक असते. हे विषय नसल्यास संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही म्हणूनच ११ वीच्या प्रवेशाच्या वेळी विषयांची निवड योग्य पद्धतीने करावी.
अॅक्च्युअरीअल सायन्स, बी.एस्सी. (आय.टी.)-
१२ वी कोणत्याही शाखेतून केले तरी चालेल पण गणित विषय घेणे आवश्यक आहे.
आर्किटेक्चर:
आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना गणिताबरोबरीनेच भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषय देखील १२ वीला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या वर्षी १० वीची परीक्षा दिलेल्या व आर्किटेक्चरला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी ११ वीला विज्ञानशाखेत प्रवेश घेणे योग्य ठरेल.
इंजिनीयरिंग, मर्चंट नेव्ही, एन.डी.ए. ( हवाईदल व नौदल प्रवेशासाठी), ॲग्री इंजिनीयरिंग
१२ वी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषय घेणे आवश्यक आहे.
मेडिकल अभ्यासक्रम, पॅरामेडिकल अभ्यासक्रम, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, फिशरीज सायन्स, ऑप्टोमेट्री, डेंटल मेकॅनिक-
१२ वी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषय घेणे आवश्यक आहे.
कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रम व बी.एस्सी. (बायोटेक्नोलॉजी) साठी १२ वी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र विषय आवश्यक आहे.
फार्मसी पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयासोबत गणित किंवा जीवशास्त्र विषय घेणे आवश्यक आहे.
पदवीला मानसशास्त्र विषय घ्यायचा असेल ११वीलाच मानसशास्त्र विषय घेणे उपयुक्त ठरते.
फाईन आर्टसच्या पदवीला प्रवेश देताना चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेतील ग्रेडनुसार १० पैकी गुण दिले जातात. (ए ग्रेड- १० गुण, बी ग्रेड-६ गुण, सी ग्रेड-४ गुण) त्यामुळे फाईन आर्टसला – जाऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी शाळेत इंटरमिजीएटची परीक्षा दिली नसल्यास ११वीला असताना इंटरमिजिएट परीक्षा देणे उपयुक्त ठरेल.
कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी १२वीच्या गुणांना ३० टक्के वेटेज असते तसेच आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ वी बोर्डाच्या परीक्षेतील गुणांना ५० टक्के वेटेज असल्याने १२ वीच्या परीक्षेकडे गाभीयनि पाहणे आवश्यक आहे.
हे वाचले का?
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना: लाभ घेण्याचे आवाहन
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना विविध वेबसाईट मिळणारे लाभ
जात प्रमाणपत्र पडताळणी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा